Home स्टोरी राज्याच्या औद्योगिक विकासासाठी महाराष्ट्र चेंबरचे आणखी एक महत्वपूर्ण पाऊल!

राज्याच्या औद्योगिक विकासासाठी महाराष्ट्र चेंबरचे आणखी एक महत्वपूर्ण पाऊल!

124

लघु व मध्यम उद्योगांना 40% सवलतीच्या दरात वीज उपलब्ध होणार!

 

मसुरे प्रतिनिधी:

 

महाराष्ट्राच्या व्यापार, उद्योग, कृषी उद्योग, सेवा उद्योग क्षेत्राची शिखर संस्था म्हणून शतक महोत्सव कडे वाटचाल करणाऱ्या “महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज & अग्रिकल्चर” या संस्थेने महाराष्ट्राच्या औद्योगीकरणाचा पाया रचण्या बरोबरच अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत.

 

सध्याच्या कार्यकारिणीने पदभार स्वीकारल्यानंतर राज्याच्या व्यापार, उद्योगाच्या विकासासाठी विविध योजना आखून त्यावर कार्य सुरू केले. त्याबरोबरच उद्योग, व्यापार क्षेत्राचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा विशेष पुढाकार घेतला.

 

जून 2022 मध्ये राज्यात झालेल्या सत्ता बदलानंतर चेंबरने उद्योग क्षेत्राचे प्रलंबित अनुदान व वीज दरवाढ हे दोन महत्त्वपूर्ण विषय प्राधान्याने हाती घेतले. त्याचबरोबर प्लास्टिक बंदीतील अडचणीच्या तरतुदी रद्द करणे, अन्नधान्यावरील कर, आकारणी बाजार समिती कायद्यातील जाचक तरतुदी असे अनेक विविध विषय वेगवेगळ्या स्तरावर हाताळले आहेत.

 

उद्योगाचे प्रलंबित 2300 कोटी रुपये अनुदान मिळवून देण्यात महाराष्ट्र चेंबरला यश मिळाले. प्लास्टिक बंदीतील पेपर प्रोडक्ट व नॉन वोव्हन बॅग्स ची बंदी उठवण्यामध्ये यश मिळाले. अशा अनेक यशस्वी वाटचालीच्या बरोबरच सातत्याने लावून झालेल्या विज दरवाढीच्या प्रश्नांमध्ये राज्यातील उद्योगांना दिलासा देता येईल अशी महत्त्वपूर्ण सुरुवात आज 23 ऑगस्ट 2023 च्या ऐतिहासिक दिवशी करण्यात महाराष्ट्र चेंबरला यश मिळाले.

 

राज्यातील उद्योगांना सध्या द्याव्या लागणाऱ्या विज दरामध्ये 40% पर्यंतची सवलत मिळेल अशा पद्धतीने रूफ-टॉप सोलर च्या माध्यमातून एक नवी क्रांती घडविण्याचा अध्याय आज लिहिण्यास प्रारंभ झाला आहे.

 

महाराष्ट्र सरकारचा उपक्रम असलेल्या महाप्रीत व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या दरम्यान आज आम्ही एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. राज्यातील लघु व मध्यम उद्योगांना स्वतः कोणतीही अतिरिक्त गुंतवणूक न करता एका विशेष व्यवस्थेमध्ये रूट ऑफ रफ-टॉप सोलरची यंत्रणा उभारून किमान 40 टक्के कमी दरामध्ये वीजपुरवठा होईल, जागतिक बँकेचा आर्थिक सहभाग असलेला अशा प्रकारचा उपक्रम राबवण्याच्या बाबतीतल्या करारावर आज स्वाक्षऱ्या केल्या.

 

लवकरच राज्यभरातल्या उद्योजकांना याविषयी सविस्तर माहिती दिली जाईल.

 

विज दरवाढीच्या प्रश्नावर चेंबरने हाती घेतलेले अभियान सवलतीच्या दरातील वीज उपलब्ध देऊन करून देऊन काही प्रमाणात दिलासा देण्याचा महाराष्ट्र चेंबरचा हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्याला पूर्ण राज्यांमध्ये याची यशस्वी अंमलबजावणी करावयाची आहे.

 

ऐतिहासिक दिवशी झालेल्या या करारावर स्वाक्षरीसाठी महाप्रीत चे चेअरमन श्री बिपिन कुमार श्रीमाळी, संचालक पुरुषोत्तम जाधव,चीफ जनरल मॅनेजर दीपक कोकाटे, चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनिल लोढा, या करारासाठी विशेष पुढाकार घेतलेले उपाध्यक्ष रवींद्र मानगावे, करुणाकर शेट्टी, शुभांगी तिरोडकर, कांती चोपडा, श्रीकृष्ण परब, चेंबरचे सर व्यवस्थापक सागर नागरे, नितीन भट यांच्यासह महाप्रीत चे अनेक अधिकारी उपस्थित होते.