सिंधुदुर्ग: कणकवली रोटरी आनंद मेळा कणकवली येथे बुधवारी 15 मार्च रोजी झालेल्या राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेत कणकवलीची इयत्ता अकरावी (विज्ञान) शाखेत शिकणारी पूर्वा पंढरी मेस्त्री हिने राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला त्यावेळी तिचा लावणी साम्राज्ञी म्हणून सत्कार करण्यात आला. अशा या उत्कृष्ट प्रकारे सादरीकरणाचं व तिच्या यशाचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.