Home क्राईम राजू पाल हत्याकांड प्रकरणावर आज माफिया डॉन अतिक अहमदला फाशी की जन्मठेप?

राजू पाल हत्याकांड प्रकरणावर आज माफिया डॉन अतिक अहमदला फाशी की जन्मठेप?

135

उत्तर प्रदेशातील माफिया डॉन अतिक अहमद याला उत्तर प्रदेशात नेण्यात आलं आहे. आतिकवर एन्काऊंटरची टांगती तलवार असल्याने या प्रकरणात नेमकं काय घडतं? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. उमेश पाल अपहरण प्रकरणात १६ वर्षांच्या प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर, प्रयागराजचे विशेष न्यायालय मंगळवारी निकाल देणार आहे. त्यामुळे आज अतिक अहमदसाठी महत्त्वाचा दिवस आहे. अतिक हा उमेश पाल अपहरण प्रकरणातील मुख्य आरोपी आहे.

बसपा आमदार राजू पाल(संग्रहित फोटो )

२५ जानेवारी २००५ रोजी बसपा आमदार राजू पाल यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात अतिक अहमद, त्याचा भाऊ अशरफ यांच्यासह ५ आरोपींची नावे आहेत. तर चार अज्ञातांना आरोपी करण्यात आले. या प्रकरणात राजू पाल यांचे नातेवाईक उमेश पाल हे मुख्य साक्षीदार होते. उमेशचे २८ फेब्रुवारी २००६ रोजी अतिक अहमदने अपहरण केले होते. त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. २८ फेब्रुवारी २००६ रोजी अतिक अहमदसमोर झुकण्यास नकार दिल्याने त्याचे बंदुकीच्या धाकावर अपहरण करण्यात आल्याचा उमेशने आरोप केला आहे. याप्रकरणी न्यायालयाने सुनावणी पूर्ण केली आहे. आज न्यायालयात फाशी किंवा जन्मठेप शिक्षा सुनावली जाऊ शकते. न्यायाधीश डीसी शुक्ला यांच्या कोर्टाने अतिकला २८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता हजर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याला सोमवारी संध्याकाळी अहमदाबादच्या साबरमती सेंट्रल जेलमधून प्रयागराजला नेले. अतिकला नैनी मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. अतिक व्यतिरिक्त त्याचा भाऊ अशरफसह अन्य आरोपीही न्यायालयात हजर राहणार आहेत. पोलिसांच्या आरोपपत्रात ११ आरोपींचा उल्लेख आहे.