सिंधुदुर्ग प्रतिनिधी: पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ एप्रिलपासून २ दिवसांच्या केरळ दौर्यावर असणार आहेत. या दौर्यात त्यांना माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासारखेच मानवी बाँबने उडवून देणार्या धमकीचे पत्र मिळाल्याची माहिती केरळचे भाजप अध्यक्ष के. सुरेंद्रन् यांना दिली.
१. सुरेंद्रन् म्हणाले, ‘‘पंतप्रधानांच्या संदर्भात आलेले धमकीचे पत्र मल्ल्याळम् भाषेत लिहिले असून पत्रात पाठवणार्याचे नाव हे कोची येथील निवासी एन्.जे. जॉनी असे उल्लेखित आहे.’’
२. पोलिसांनी तात्काळ जॉनी यांच्या घरावर छापा टाकला; पण संबंधित पत्राविषयी काहीच माहिती नसल्याचे जॉनी यांनी सांगितले.
३. मोदी यांच्या सुरक्षेशी संबंधित गुप्तचर अहवाल फुटला आहे. या गंभीर घटनेवरूनही सुरेंद्रन् म्हणाले की, पोलिसांनी ही गंभीर चूक केली आहे. याची चौकशी झाली पाहिजे. संबंधित अहवाल ४९ पानांचा असून त्यामध्ये कर्तव्यावर असलेल्या अधिकार्यांची नावे, पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचा तपशीलवार तक्ता आणि अन्य सूत्रे अंतर्भूत आहेत.