Home स्टोरी राजवाडा येथील वळणावर रस्त्यावर ऑइल पडल्याने तीन दुचाकीना अपघात

राजवाडा येथील वळणावर रस्त्यावर ऑइल पडल्याने तीन दुचाकीना अपघात

69

सावंतवाडी प्रतिनिधी: बुधवार दिनांक मार्च रोजी रात्री 9:30 च्या दरम्याने राजवाडा येथील वळणावर रस्त्यावर ऑइल पडून ते सगळीकडे पसरल्याने तीन मोटरसायकल चालकांची एक्सीडेंट झाली. त्यामध्ये आरेकर कॅन्टीन मध्ये काम करत असलेला तांबे नामक एका मोटर चालकाच्या डोक्याला गंभीर मुका मार बसून तो काही वेळ बेशुद्ध अवस्थेत पडला होता. तेव्हा त्या ठिकाणावरून जात असलेले प्रसाद कोरगावकर व सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते शरद पेडणेकर यांनी त्याला मदत केली. तसेच कोरगावकर यांनी आपली ॲम्बुलन्स मागवून सदर व्यक्तीला तात्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयांमध्ये दाखल केले व याची माहिती सामाजिक बांधिलकीचे माजी नगरसेवक संजय पेडणेकर यांना मिळताच त्यांनी तात्काळ हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. सदर एक्सीडेंट झालेल्या व्यक्तीला उलट्या होऊ लागल्यामुळे सिटीस्कॅन साठी डॉक्टरांनी कुडाळ येथे पाठवले. परंतु राजवाडा येथे एक्सीडेंटची सिरीयल सुरू होती. तो अनर्थ टाळण्यासाठी संजय पेडणेकर व शरद पेडणेकर राजवाडा येथे सुरक्षितेसाठी दाखल झाले व रस्त्यावर पडलेले ऑइल धुवून टाकण्यासाठी पेडणेकर यांनी लगेच नगरपालिकेचा बंब मागून घेतला. व रस्ता स्वच्छ करण्यासाठी पालिकेंच्या कर्मचाऱ्यांना मदत केली. त्यामुळे अजून पुढे होणारा अनर्थ टळला.