सिंधुदुर्ग प्रतिनिधी: ठाणे जिल्हा ग्रंथालय संघ आणि मराठी ग्रंथ संग्रहालय जिल्हा अ वर्ग ठाणे यांच्या सहकार्याने कोकण विभागीय ग्रंथालय संघाचे २४ वे वार्षिक अधिवेशन येत्या रविवार दि. २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९:००ते सायंकाळी ५:०० या वेळेत ठाणे येथील मराठी ग्रंथ संग्रहालय सरस्वती मंदिर वाअरेगे सभागृह येथे आयोजित करण्यात आले आहे.
या वार्षिक २४ व्या ग्रंथालय संघ अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार आशिष शेलार, आमदार निरंजन डावखरे, ग्रंथालय संचालक दत्तात्रय श्री सागर, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉक्टर गजानन कोटेवार, ग्रंथालय सहाय्यक संचालिका शालिनी इंगोले, जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील, शशिकांत काकड संजय बनसोडे, अजित पवार, अविनाश येवले, सचिन हजारे आधी उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात सकाळी ९:०० वाजता प्रतिनिधी नोंदणी परिचय, १०:३० वाजता अधिवेशन उद्घाटन सोहळा, दीप प्रज्वलन दुपारी १२:३० वाजता, सार्वजनिक ग्रंथालय सेवेतील नवीन प्रवाह वक्ते राजशेखर बालेकर यांचे दुपारी २:३० वाजता खुले अधिवेशन आणि समारोप होणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर, चांगदेव काळे आदीने केले आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रंथालयातील ग्रंथालय सेवक प्रतिनिधी यांनी या अधिवेशनात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मस्के यांनी केले आहे.