Home स्टोरी रविवारी ११ ऑगस्ट रोजी सावंतवाडी शहाबुद्दीन हॉल या येथे रानभाजी स्पर्धेचे आयोजन.

रविवारी ११ ऑगस्ट रोजी सावंतवाडी शहाबुद्दीन हॉल या येथे रानभाजी स्पर्धेचे आयोजन.

509

सावंतवाडी प्रतिनिधी: सह्याद्री फाउंडेशन व सावंतवाडी नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मान्सून महोत्सव निमित्ताने रविवारी ११ ऑगस्टला सायंकाळी चार वाजता काजी शहाबुद्दीन हॉल या ठिकाणी रानभाजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धकांनी कोकणातील पावसाळी रानभाज्या तयार करून आणायचे आहेत. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक ५०९९ तृतीय पारितोषिक ३००० तृतीय पारितोषिक २००० व उत्तेजनार्थ १००० असे पारितोषिक ठेवण्यात आले आहेत. जिल्हास्तरीय स्पर्धा असून कोकणातील पावसाळी ऋतू जंगलात आढळणाऱ्या विविध वनस्पती तसेच आधीपासून भाज्या बनवल्या जातात.

टायकाळा, अळू, कोंबचे आधी रानभाज्य पासून विविध पदार्थ बनवले जातात. या पदार्थांचे प्रदर्शन व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा गेली पाच वर्ष आयोजित करण्यात येत आहे. तरी जास्तीत जास्त स्पर्धाकांनी या स्पर्धेत भाग घ्यावा, तसेच खवयानीही या स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ व कार्य प्रमुख एडवोकेट संतोष सावंत, अध्यक्ष रवींद्र मडगावकर यांनी केले आहे.