Home स्टोरी रमेश बैस महाराष्ट्राचे नवे २० वे राज्यपाल…. राजभवनात मराठीतून घेतली शपथ….

रमेश बैस महाराष्ट्राचे नवे २० वे राज्यपाल…. राजभवनात मराठीतून घेतली शपथ….

56

संसदीय राजकारण आणि समाजकारणाचा पाच दशकांचा अनुभव असलेले रमेश बैस यांनी शनिवार दि १८ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांनी त्यांना राज्यपाल पदाची शपथ दिली. मूळ छत्तीसगढचे असूनही महाराष्ट्राच्या मातृभाषेत शपथ घेत त्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. रमेश बैस हे महाराष्ट्र राज्याचे २० वे राज्यपाल आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.

शपथविधीनंतर न्यायमूर्ती गंगापूरवाला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. भारतीय नौदलातर्फे राज्यपालांना मानवंदना देण्यात आली. महाराष्ट्राला अभ्यासू व्यक्तिमत्त्व राज्यपाल म्हणून लाभले आहे. त्यांच्या अनुभवाचा महाराष्ट्राला नक्कीच फायदा होईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांविषयी गौरवोद्गार काढले.