Home राजकारण रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील साई रिसॉर्टचा मुद्दा पुन्हा चर्चेत

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील साई रिसॉर्टचा मुद्दा पुन्हा चर्चेत

42

हायकोर्टाने दिले ईडीला महत्वाचे आदेश त्यामुळे अनिल परब यांना मोठा दिलासा!दोनदिवसांपूर्वी रत्नागिरी दापोलीतील साई रिसॉर्टशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने सदानंद कदम यांना अटक केल्यानंतर अनिल परब यांनी कोर्टात धाव घेतली होती. काही तासांपूर्वीच, जयराम देशपांडेना अटक करण्यात आली आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील साई रिसॉर्टचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. साई रिसॉर्ट हे अनिल परब यांचं नसून रामदास कदम यांचे भाऊ सदानंद कदम यांचं असल्याचा गौप्यस्फोट जानेवारी महिन्यात राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी केला होता. साई रिसॉर्टच्या बेकायदा बांधकामाचं प्रकरण राज्यातील राजकीय वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून गाजत आहे. या प्रकरणात याआधी अनिल परब यांचंही नाव आलं होतं. किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण उचलून धरत अनेक ठिकाणी तक्रारी केल्या होत्या. यात अनिल परब यांची चौकशीही करण्यात आली होती.