Home जाहिरात येणारं वर्ष हे जातीय दंगलींचं! जितेंद्र आव्हाड

येणारं वर्ष हे जातीय दंगलींचं! जितेंद्र आव्हाड

109

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.येणारं वर्ष हे जातीय दंगलीचं असेल असं खळबळजनक वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भाजपने तक्रार दाखल केली आहे. राम नवमी आणि हनुमान जयंतीवरून केलेल्या वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाड वादात सापडलेत. राम नवमी आणि हनुमान जयंती हे उत्सव दंगलीसाठी झालेत की काय?असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलाय. इतकेच नाही तर येणारं वर्ष हे जातीय दंगलींचं असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या या वक्तव्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतलाय. जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भाजपच्या युवा मोर्चाने आंदोलनही केलं. अंधेरी पूर्व पोलीस ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.