मुंबई: आदित्य ठाकरेंच्या युवासेनेत सचिव पदावर कार्यरत असणाऱ्या दुर्गा भोसले-शिंदे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे. दुर्गा भोसले-शिंदे यांच्या निधनानं राजकीय कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे. नुकत्याच ठाण्यात झालेल्या जनआक्रोश मोर्चात दुर्गा भोसले शिंदे सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्यादिवशीच त्यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी दुर्गानं अखेरचा श्वास घेतला आहे. दुर्गा भोसले-शिंदे यांच्या पश्चात पती, आई, वडील आणि भाऊ असं कुटुंब आहे. राज्यभरात युवासेनेच्या संघटनात्मक बांधणीत दुर्गा भोसले शिंदे यांचा मोलाचा वाटा होता. दुर्गा भोसले शिंदे यांच्या अचानक एक्झिटने ठाकरे गटाला मोठी हानी पोहचली आहे. दुर्गा यांना बॉम्बे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.