Home राजकारण युवासेनेच्या वतीने डि एड पदवीधारक स्थानिक भूमीपुत्रांना न्याय मिळण्यासाठी शिक्षणमंत्री दिपकभाई केसरकर...

युवासेनेच्या वतीने डि एड पदवीधारक स्थानिक भूमीपुत्रांना न्याय मिळण्यासाठी शिक्षणमंत्री दिपकभाई केसरकर यांच्या कार्यालयासमोर करणार आंदोलन-युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांची माहिती.

68

कुडाळ प्रतिनिधी:- डिएड च्या स्थानिक भूमिपुत्रांना जिल्ह्यातच डि एडच्या भरतीद्वारे सामावून घ्यावे तसेच डीएडच्या मेरिट च्या प्रमाणे भरती व्हावी,१९९६, २००७ मध्ये ज्या पध्दतीने भरती झाली होती त्याचपद्धतीने यावेळी देखील भरती व्हावी अशी मागणी केली होती. शिक्षणमंत्री हे सत्तेत मशगुल असल्याने त्यांना ह्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे नाही,जिल्ह्यात आंदोलन होऊ नये म्हणून जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे,युवकांचा आवाज बंद करणाच्या प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून चालू आहे,झोपेत असलेल्या शिक्षणमंत्री यांना जागे करण्यासाठी हे आंदोलन युवासेनेच्या वतीने करण्यात येणार आहे अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी दिली.