Home राजकारण ‘या वादळाला कोण थांबवणार?’ राष्ट्रवादीचे आमदार रोहित

‘या वादळाला कोण थांबवणार?’ राष्ट्रवादीचे आमदार रोहित

172

८ जुलै वार्ता: अजित पवार यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अन्य आठ आमदारांनी गेल्या रविवारी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा समावेश आहे. छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेल्या येवला (नाशिक) मतदारसंघातून शरद पवार आपल्या दौऱ्याचा शुभारंभ करत आहेत. या दौर्‍यामध्ये शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे, डॉ. जितेंद्र आव्हाड, खासदार अमोल कोल्हे हे सहभागी झाले आहेत. शरद पवार यांच्या या राज्यव्यापीदौऱ्याला उद्देशून ट्वीट करत, ‘या वादळाला कोण थांबवणार?’ असा सूचक इशारा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिला आहे. ठाणेमार्गे येवले येथे जात असताना पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी ढोल ताशे आणि फटाक्यांच्या गजरात शरद पवार यांचे जोरदार स्वागत केले. शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास शरद पवार यांचे आनंद नगर चेक नाका येथे आगमन झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘आम्ही सारे साहेबांसोबत’, ‘देशाचा बुलंद आवाज शरद पवार’, ‘देश का नेता कैसा हो, शरद पवार जैसा हो’ अशी घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केल्यानंतर शरद पवार नाशिकच्या दिशेने रवाना झाले.