या’ फलंदाजाचा युवराजसारखा धमाका, एकाच ओव्हरमध्ये ठोकले 6 सिक्स इस्लामाबाद : क्रिकेटमध्ये कधी काय होईल, हे सांगता येत नाही किंवा अंदाजही बांधता येत नाही. वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक, हॅटट्रिकचं प्रमाण सध्या वाढलंय. मात्र एका ओव्हरमध्ये 6 सिक्स ठोकण्याचा कारनामा हा क्वचितच होतो. एका ओव्हरमध्ये 6 सिक्स मारणं म्हणजे खाण्याचं काम नाही. टीम इंडियाकडून युवराज सिंह याने असा भीमपराक्रम केला आहे. तेव्हापासून ते आतापर्यंत अवघ्या मोजक्याच फलंदाजांनी अशी कामगिरी केली आहे. यात आता आणखी एका फलंदाजाचं नाव जोडलं गेलं आहे. एका आक्रमक बॅट्समनने एका ओव्हरमध्ये 6 सिक्स लगावले आहेत. याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
फलंदाजाने हा पराक्रम पाकिस्तान खेळवण्यात आलेल्या सामन्यात झाला. पाकिस्तानचा बॅट्समन इफ्तिखार अहमद याने ज्या बॉलरच्या बॉलिंगवर 6 सिक्स मारले तो पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचा अंतरिम क्रीडा मंत्रीही आहे. इफ्तिखारने वहाब रियाजच्या बॉलिंगवर दे दणादण एका ओव्हरमध्ये 6 सिक्स ठोकले.
इफ्तिखारने क्वेटा ग्लेडिएटर्सकडून खेळताना पेशावर जालमी विरुद्ध 20 ओव्हरच्या या सामन्यात 50 बॉलमध्ये 94 धावांची खेळी केली. हा प्रदर्शनी सामना होता. याच सामन्यात इफ्तिखारने केलेल्या कारनाम्यामुळे क्रिकेट चाहतेही सुखावले.