Home स्टोरी म्हातारं माणूस आहे, म्हणून मी काही बोलत नाही! मनोज जरांगे पाटीलांचा भुजबळ...

म्हातारं माणूस आहे, म्हणून मी काही बोलत नाही! मनोज जरांगे पाटीलांचा भुजबळ यांच्यावर हल्लाबोल……

143

२१ नोव्हेंबर वार्ता: माझे काही वाद होते पण व्यक्ती म्हणून कधीच विरोध नव्हता. मात्र आता व्यक्ती म्हणून सुद्धा विरोध आहे. म्हातारं माणूस आहे, म्हणून मी काही बोलत नाही. पण मराठा आरक्षणाला विरोध केला तर मग मात्र काय खरं नाही, असे म्हणत मरठा आंदोलक मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांवर हल्लाबोल केला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगेचं देहू, आळंदीत जंगी स्वागत करण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले. त्यानंतर सरकारला महाराजांच्या ओवींची आठवण करून दिली. सरकारला सद्बुद्धी मिळो असं साकडं जरांगेंनी या वेळी घातले.

पुढे बोलतांना जरांगे म्हणाले, माऊली हे सर्वांना आशीर्वाद देऊन अनेकांचे संसार वसवतात. आरक्षणासाठीही त्यांनी आशीर्वाद दिला आहे.वारकरी संप्रदाय देखील आरक्षणासाठी पुढे येत आहे. जो संप्रदाय आजतागायत अशा गोष्टीत पडत नव्हता मात्र अनेक महंतांनी यावर भाष्य केलंय.अगदी देवाने ही आपल्याला कौल दिलाय. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांना ही त्रास दिला गेला आह. तुम्ही ही थोडा त्रास सहन करा.