Home क्राईम म्हसळा शहरांतील मध्यवर्ती ठिकाणची पानटपरी चोरट्यानी फोडली!सुमारे ४४ हजाराची चोरीची पोलीसांत नोंद.

म्हसळा शहरांतील मध्यवर्ती ठिकाणची पानटपरी चोरट्यानी फोडली!सुमारे ४४ हजाराची चोरीची पोलीसांत नोंद.

185

म्हसळा प्रतिनिधी:(संजय खांबेटे): म्हसळा बाजार पेठेंतील सर्वांत आद्ययावत आशा पानपट्टी स्टॉलचे दुकान चोरटयाने फोडून किमान रु ४४ हजाराचा मुद्देमाल आणि रोख चोरट्यानी लंपास केल्याची फिर्याद पान टपरीचे मालक रामअवतार धिमर वय ४० यानी म्हसळा पोलीसांत केली. म्हसळा पोलीसानी गु.र.नं. ५२/२०२३ भा.द.वि. कलम४६१,३८० प्रमाणे नोंद केली आहे. मालक  रामअवतार यांचे वेलकम २ या पानस्टालचे मागील बाजूने चोरट्यानी प्रवेश करून फेमस सिगारेट, सिव्हीजी स्मुथ ६४ एफ् टी., प्लोमिक्स कप सिगारेट आणि रोख रु२२ हजार असे एकूण रु ४३,४२८ एवढा ऐवज लंपास झाल्याचे  पोलीस सूत्रानी सांगितले.सदर चोरीचा तपास स.पो.नी.संदीपान सोनावणे यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉं.संदीप चव्हाण करीत आहेत.”कायद्यानुसार शाळा, महाविद्यालयां पासून १०० यार्डाच्या परिसरात सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होताना आढळल्यास विक्रेत्यांवर पोलीस कारवाई होणे जरुरी असताना संपूर्ण म्हसळा तालुका तंबाखू मुक्त तालुका असून या पानपट्टी स्टॉलला नगरपंचायत प्रशासनाने परवानगी दिलीच कशी ? या बाबतही पोलीस प्रशासनाने चौकशी करावी आशी नागरिकांकडून मागणी पुढे येत आहे.