Home स्टोरी म्हसळा तालुक्यातील सुमारे साडे पाच हजार जिवावर येणार बिकट वेळ! संजय खांबेटे

म्हसळा तालुक्यातील सुमारे साडे पाच हजार जिवावर येणार बिकट वेळ! संजय खांबेटे

137

म्हसळा प्रतिनिधी: (संजय खांबेटे): म्हसळा तालुक्यातील  मेंदडी, तुरूंबाडी, वारळ, काळसुरी, या चार गावातीलसुमारे ५ ते साडेपाच हजार लोकसंखेला मेंदडी, जिल्हा परिषद पाझर तलावांतून स्वतंत्र योजनेद्वारे पाझर तलावांचे खालील बाजूने आसलेल्या विहीरींतून पंपाद्वारे साठवण टाकी मार्फत पाणीपुरवठा केला जातो. तलावंतील पाणी साठा कमी झाल्याने पाण्यातील जलपर्णी वनस्पती आणि चिखलामुळे पाण्याला वास आणि रंग येत  आसल्याचा स्पष्ट दावा वारळ ग्रामस्थांचा आहे. आशाच पध्दतीने वैद्यकिय आधिकारी प्रा.आ.केंद्र मेंदडी  डॉ.श्रध्दा मच्छींद्र पाटील यानी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यानी मेंदडी पाझर तलावातील पाणी, पाझर तलावा खालील विहीरींतील पाण्याची प्रत्यक्ष पहाणी करता पाणी पिवळसर रंगाचे, गढूळ जल पर्णवनस्पती मिश्रीत आसल्याचे स्पष्ट दिसत आसल्याचे  ग्रा.पा.पुरवठा विभागाला कळवून मेंदडी ,तुरूंबाडी, वारळ,काळसुरी, या चार गावातून पिण्याचे पाणी पुरवठा करताना विशेष काळजी घ्यावी असे पत्र दिलेआहे. दुसरीकडे आरोग्य आधिकाऱ्यानी वारळ येथील काळसुरे, मेंदडी, तुरूंबाडी असे धरणाचे विविध भागातील तसेच अन्य ठिकाणचे पाणी नमुने अनुजीव शास्त्रज्ञ माणगाव यांचेकडून तपासून घेतले असता संबधीत धरण परिसर व चार गावाना होत असलेला पाणी पुरवठा हा पिण्यास योग्य आसल्याचा दावा संबधीत विभागाने केला आहे. हे पाण्याचे नमुने आरोग्य कर्मचारी आणि स्थानिक ग्रामपंचायतींचे जल सुरक्षक घेत असतात नव्याने मंजुर झालेली वारळ जल जीवन मिशन योजना खासदार सुनिल तटकरे, आमदार आदिती तटकरे यांच्या शिफाशीनुसार म्हसळा तालुक्यातील मौजे वारळ गावासाठी  ९४ लक्ष २१ हजार रुपये खर्चाची पाणी पुरवठा योजना मंजुर करण्यात आली आहे. ती या स्त्रोत मेंदडी धरणाखालील विहीरी हाच आहे. तो बदलून खरसई धरणातून घ्यावा म्हणून स्थानिक ग्रामस्थानी मागणी लावून धरली आहे. नव्याने सुरु असलेले काम तात्काळ थांबवावे अशी मागणीही खासदार सुनिल तटकरे यांच्याकडे ग्रामस्थ करीत आहेत.

वारळ मधील पाणी समस्या,दूषीत पाणी बाबत सुनित सावंत, शकील साटविलकर  यांचे बरोबरीने आता वारळ ग्रामस्थ प्रमुख मधुसूदन पाटील,माजी सरपंच जहुर काझी, महेश बिराडी, रफिक काझी आणि अन्य ५५ ग्रामस्थांनी मेंदडी धरणाचे पाणी नको आसा आग्रह शासनाकडे सातत्याने करीतआहेत. म्हसळा तालुका ग्रामिण पाणी पुरवठा विभागाकडे जलजिवन मिशनची कोण्यावधी रुपयाची किमान ५२ कामे सुरु असून काल सोमवार दि.१० रोजी कार्यालयांत कोणीच आधिकारी नसल्याने ग्रामस्थाना अखेर गजानन सीताराम मकाजी या शिपाई दादाला निवेदन देऊन समाधान मानावे लागले.