Home स्टोरी म्हसळा तालुक्याची पाणी टंचाई दूर करण्यासाठी सर्व स्तरांवर शासन सज्ज सुमारे रु...

म्हसळा तालुक्याची पाणी टंचाई दूर करण्यासाठी सर्व स्तरांवर शासन सज्ज सुमारे रु २१ लक्ष रुपयांचा निधी मंजूर.

145

म्हसळा प्रतिनिधी: सुमारे १२ वर्षापासून टँकरमुक्त आसलेल्या म्हसळा तालुक्याला सर्वसाधारणपणे एप्रिल ते जून या कालावधीत टंचाईची झळ लागते म्हणून आमदार आदीती तटकरे यानी रु २१ लक्ष निधी मंजुर केला आहे .तालुक्यातील संभाव्य युक्त टंचाईग्रस्त  गावे -वाड्या पुढील प्रमाणे -कुडगाव कोंड, खारगाव खुर्द ,रोहीणी,खारगाव बु ,आडी ठाकूर, गायरोणे,खामगाव, गडदाब,आंबेत,सुरई ,निगडी  दगडघूम वाड्या लेप गौळवाडी, वाघाव बौध्दवाडी, कृष्णनगर नवीवाडी आंबेत. सकलप कोंड, आगरवाडा बौद्धवाडी ,आगरवाडा आदीवासी वाडी, खामगाव गौळवाडी ,खामगाव सोनघर , खामगाव मोहल्ला,कासर मलई , जिजामाता हायस्कूल,पेढांबे आदीवासी वाडी ,बेटकरवाडी पाभरेबेटकरवाडी, चिचोंडे पाभरे,अशी१५ गावे आणि १२ वाङ्यांचा आराखडयांत समावेश आहे. त्यासाठी सुमारे २१लक्ष रुपयांचा निधी मंजुर केलाआहे. यामध्ये नव्याने विंधण विहीरी खोदणे  आणि विहीरींची खोली वाढविणे आसा  कार्यक्रम रहाणार आहे. .” तालुक्यांत मागील सुमारे चार-  वर्षांत राष्ट्रीय आणि ग्रामिण पेयजल कार्यक्रम, भारत निर्माण योजना, जल जीवन मिशन आशा विविध योजनाद्वारे ६४ गाव वाङ्यांतून सुमारे रु ४१० कोटीचा निधी खासदार सुनिल  तटकरे आणि आमदार आदीती तटकरे यानी आणला आहे”.नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, अपव्यय करू नये, पिण्याच्या पाण्याच्या मुख्य स्त्रोतां व्यतिरिक्त परिसरातील इतर उपलब्ध स्त्रोतांमधील पाण्याचा दैनंदिन वापरासाठी वापर करावा, पाणी स्त्रोत दूषित होणार नाहीत याची सर्वांनी काळजी घ्यावी, कुठे पाणी पुरवठा पाइपलाइन फुटली असल्यास निदर्शनास आणून द्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील जिल्ह्यांत विविध कार्यक्रमांतून करताना नागरिकांची कार्यशाळा घेत असतात, तालुक्यांतील अनेक गावाना ३ वर्षांत कोटयावधी रुपयाच्या  दोन योजना एकाच गावासाठी राबविण्यात येतात त्याही सदोष याबाबत आधिकारी ठेकेदार यांच्या कार्यशाळा घेउन सदोष काम तात्काळ थांबवून ठेकेदार- तांत्रिक आधिकारी यांच्यावर कारवाई होणे जनतेला अपेक्षित आहे.

नळ योजना पाईप लाईन जमीनी पासून तीन फूट खोदून टाकणे आवश्यक असताना सुरई राष्ट्रीय पेयजल योजनेचे पाईप जमीनीवरून टाकण्याचे भ्रष्ट काम व्हिडीओत दिसत आहे.