Home स्टोरी म्हसळयांत शिवजयंती उत्साहांत झाली साजरी : बहुतांश राजकीय पक्ष रयतेच्या राज्याचे...

म्हसळयांत शिवजयंती उत्साहांत झाली साजरी : बहुतांश राजकीय पक्ष रयतेच्या राज्याचे झेंडया खाली आले एकत्र.

286

म्हसळा प्रतिनिधी :(संजय खांबेटे): म्हसळा शहरांत आज तिथीनुसार शिवजयंती उत्साहांत साजरी झाली , शहरांतील सर्वच राजकीय पक्षांचे बरोबरीने सर्वच महीला वर्ग पारंपारिक वेशभूषेसह उपस्थित होत्या, हे मिरवणुकी तील मुख्य आकर्षण होते, कार्यक्रमाची सुरवात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष समीर बनकर यानी श्रीफळ वाढवून केले.

राजकीय पक्षांत शिवसेना उबाठा गटाचे तालुका प्रमुख सुरेश कुडेकर, उप- जिल्हाप्रमुख नंदू शिर्के,शिंदे गटाचे ता.प्रमुख प्रसाद बोर्ले,उप-तालुका प्रमुख बाबू बनकर,गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सचिन करडे यांची रायगडवरून आणलेली शिवज्योत आणि पालखी स्थानिक भा.ज.प.नेते मंगेश मुंडे, मनसे ता. प्रमुख स्वप्नील करडे चंपीयन कराटे क्लब श्रीवर्धचे रितेश मुरकर आणि म्हसळयाचे अभय कळमकर उपस्थित होते, महाराजांना मुजरा करण्यासाठी भोस्ते ता.श्रीवर्धन येथील  स्मरणिका भूते या छोटीने उत्कृष्ट भूमिका सादर केली, तर बालशिवाजीचे भूमिकेत अनय  पोतदार, मावळे म्हणून वेदांत बिरवाडकर यानी उत्कृष्ट भूमिका बजावली,महीला वर्गामधील नेहा करडे,अनिषा करडे,कल्पिता करडेगौरी पोतदार,भाविका पोतदारसिद्दी हेगिष्टे,टिना करडे यानी तसेच यतीन करडे ,बाबू बनकर या शिवभक्तानी लाठी, ढाल तलवारबाजी याची प्रात्यक्षिके केली. दादा पानसरे,योगेश करडे, अनिकेत पानसरे, कौस्तुभ करडे , नंदू सावंत यांचा कार्यकमांत सक्रीय सहभाग होता.

शिवजयंती उत्सावातील मिरवणूक