Home राजकारण मेलेल्याच्या मढ्यावरचं लोणी खाणारी संजय राऊतांची औलाद! प्रवीण दरेकर

मेलेल्याच्या मढ्यावरचं लोणी खाणारी संजय राऊतांची औलाद! प्रवीण दरेकर

62

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण या कार्यक्रमात उष्माघातामुळे १४ श्री सदस्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणामुळे विरोधक सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत घडलेल्या घटनेची जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदांचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावरून राज्य सरकारवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. याबाबत भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

प्रसार माध्यमांशी बोलत असताना प्रवीण दरेकर यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. मेलेल्याच्या मढ्यावरचं लोणी खाणारी संजय राऊतांची औलाद असल्याचे म्हणत प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. कोणत्याही गोष्टीचे विकृतीकरण करणं, विपर्यास करणं आणि आपला भोंगा चालू ठेवणं, एवढचं संजय राऊत यांना सकाळचे काम आहे. तर अशा प्रकारे मृत्यूचे राजकारण करणे हे दुर्दैवी आहे. स्वतः आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी या मृत्यूचे राजकारण करू नये, असे सांगितले आहे. तर झालेली गोष्ट दुर्दैवी आहे, हे सरकारने मान्य केलेले आहे. त्यासंदर्भात सरकार संवेदनशील आहे. पण मेलेल्याच्या मड्यावरचं लोणी खाणारी संजय राऊतांची औलाद असल्याकारणाने त्याठिकाणी अशा प्रकारचे कोणतेही टोकाचे भाष्य करणे संजय राऊतांचे चालू असते, संजय राऊत यांनी श्री सदस्यांच्या मृ़त्यूप्रकरणी राज्य सरकारवर अनेक गंभीर आरोप केलेले आहेत. महाराष्ट्र भूषण या कार्यक्रमात १४ नाही तर ५० श्री सदस्यांचा मृत्यू झाल्याचे संजय राऊत यांच्याकडून सांगण्यात आले होते. तर त्यांच्या या विधानाच्या विरोधात आमदार संजय शिरसाट यांनी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुरूवारी तक्रार देखील दाखल केलेली आहे. असं आमदार प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.