नॅशनल स्पर्धेसाठी निवड..
मसुरे प्रतिनिधी:
मूळ गाव तरळे आणि मसुरे गडगेराव वाडी येथे आजोळ असलेल्या स्वानंदी संतोष सावंत या युवतीने सतरा वर्षाखाली येथील चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र स्टेट गव्हर्मेंट राज्यस्तरीय शालेय ॲथलेटिक्स स्पर्धा 2023 क्रीडा व युवक सेवा म रा पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर द्वारा आणि संचालनायक महाराष्ट्र राज्य आयोजित 100 मीटर हरडल्स स्पर्धेमध्ये 14.82 सेकंदात पार करून प्रथम क्रमांक प्राप्त करून गोल्ड मेडल पटकाविले. 15 डिसेंबरच्या दरम्याने पाटणा येथे होणाऱ्या नॅशनल स्पर्धेसाठी ती तिची निवड महाराष्ट्र संघाकडून झाली आहे.
स्वानंदी सावंत ही उदयाचल हायस्कूल गोदरेज विक्रोळी ईस्ट या प्रशालेमध्ये इयत्ता नववी मध्ये शिकत असून तिला प्रशिक्षक महणून वीरेंद्र यादव यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
स्वानंदी हिला यापूर्वी हर्डल्स स्पर्धेमध्ये जिल्हा राज्य आणि नॅशनल स्पर्धांमध्ये ब्राँझ, सिल्वर, गोल्ड मेडल प्राप्त झालेली आहेत. मुंबईमध्ये झालेल्या अनेक स्पर्धांमध्ये तिने प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. गतवर्षी गुवाहाटी येथे झालेल्या नॅशनल स्पर्धेमध्ये तिने ब्राँझ मेडल पटकाविले होते. यावेळी बोलताना स्वानंदी सावंत म्हणाली भविष्यामध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याचा आपला मानस असून यासाठी आपण कठोर मेहनत कठोर परिश्रम घेत आहे मिळालेल्या अशा अनेक संधींचा उपयोग करून या भूमीचे, आपल्या गावाचे, आई-वडिलांचे, मार्गदर्शन करणाऱ्या गुरुजनांचे आणि संपूर्ण परिवाराचे नाव रोशन करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. स्वानंदी हिच्या या यशाबद्दल मसुरे, तरळे गावातून तसेच मुंबई येथे ती शिकत असलेल्या स्कूल मधील शिक्षकांनी आणि पालकांनी, परिवाराने तिचे विशेष अभिनंदन केले आहे. तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रपूर अविनाश पुंड आणि उपसंचालक क्रीडा व युवक सेवा नागपूर विभाग नागपूर शेखर पाटील यांनी विशेष अभिनंदन केले आहे.