Home क्राईम मुली आणि महिला यांचे अश्‍लील व्हिडिओ सिद्ध करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांच्या २ मुलांना...

मुली आणि महिला यांचे अश्‍लील व्हिडिओ सिद्ध करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांच्या २ मुलांना पालघर येथून अटक !

124

पालघर:  येथे कृत्रिम बुद्धीमतत्तेचा (‘आर्टिफिशियल अँटिलिजन्स’चा) गैरवापर करत अनेक मुली आणि महिला यांचे अश्‍लील व्हिडिओ सिद्ध करणार्‍या २ तरुणांंना अटक करण्यात आली. मुंबईत पोलीस अधिकारी असणार्‍यांच्या मुलांनी हे कृत्य केले. त्यांचे वय अनुक्रमे १९ आणि २१ वर्षे आहे. त्यांनी हे व्हिडिओ सिद्ध करून ते सामाजिक संकेतस्थळांवरही प्रसारित केले. या प्रकरणी २ मुलींनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली होती. ज्या मुलींनी या तरुणांना विरोध केला, त्यांना तरुणांनी मारहाण केली.