म्हसळा प्रतिनिधी:(संजय खांबेटे):-रास्ट्रीय स्वयंसेवक संघ , जनकल्याण समिती रायगड च्या माध्यमांतून किशोरी संवादाच्या कार्यशाळेत ८-९-११वीच्या मुला- मुलींसाठी मार्गदर्शन आणि परिसंवाद कार्यक्रमांत जनकल्याण .समिती (कोकण प्रांत)उपाध्यक्ष श्रीमती अलकाताई जोगळेकर या मुख्य मार्गदर्शकानी वाईट प्रवृतीला रोखण्यासाठी “एक ठेऊन देऊ का” ? या वाक्प्रचाराचा वापर शस्त्र म्हणून करावाअसे स्पष्ट सांगितले.यावेळी समोरच्या कडून चुकीने चुकीचा अगर हल्ल्या प्रमाणे वापर होणार आशी शक्यता वाटेल त्यावेळी सेफ्टी पीन ,कटर,तीखट पावडर,असाही वापर शक्य आसल्यास करू शकतोअसेही सांगितले गेले. कार्यक्रमाचे अध्यक्षा म्हणन श्रीमती अर्चना बनकर होत्या, यावेळी जनकल्याण रोहा येथील श्रीमती दिपा चव्हाण,विद्या जोशी,मानसी साठे, विष्णू जोशी, श्रीपाद गिरधर, स्थानिक शालेय व्यवस्थापन समिती सदस्य सुनिल ऊमरटकर,प्राचार्य हाके सर सौ.अरुणा हाके ,सौ.संगीता शिर्के ,श्रीमती वैशाली खुताडे, हनुमंत मोरे ,तडवी सर ,चक्रधर चव्हाण होते,अलकाताई जोगळेकर यानी सांगताना मुले -मुलींच्यात वयानुसार बदल होत असतो यामध्ये मुलीच्यांतील बदलामागे विज्ञानासह त्यानी माहीती दिली.

या वयांत मुला – मुलींच्यात आणि कुटुंबात संवाद वाढणे गरजेचे असते, याच वेळी मुलानीही सक्षमतेने संवाद वाढवणे आवश्यक आहे. या बदलत्या वयात मुलीनी,सर्वकश आणि संतुलीत आहार,आहारांत भरड धान्याचा समावेश असावा असेही तुलनात्मक दृष्टया सांगीतले. तर याच वेळी मुला- मुलीने भविष्यांत आपल्याला नक्की काय करायचे याची योजना करणे आवश्यक आहे. विद्यार्थी उच्च माध्यमिक शिक्षणा कडे असतो त्याच वेळी परिक्षेत मार्क मिळविणे जनरल नॉलेजकडे लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे, आभ्यासात व्यत्यय आणणारे मित्र कोणत्याचा सुध्दा आभ्यास कसा करायचा याच्या टिप्स सुध्दा श्रीमती जोगळेकर यानी दिल्या. मुलीनी .भारताचे आदर्श नागरिक होण्यासाठी मुलीना सरक्षण करता आले पाहीजे श्री छत्रपती शिवाजी महाराजानी त्याचे पेक्षा तब्बेतीने मोठ्याआसलेल्या औरंगजेबाचा युक्तीने वध केल्याचे सांगितले. कार्यक्रमात संस्थेचे संचालक सुनिल ऊमरटकर यानी आपले मनोगत व्यक्त करताना मुलांचे धारीष्टय वाढविण्यासाठी पुढच्या शैक्षणिक वर्षात विविध उपक्रम राबविण्यात सार्वजनिक वाचनालय नक्कीच सहकार्य घेईल असे सांगितले.