Home स्टोरी मुणगे येथे शालेय विद्यार्थ्यांनी उभारली अनोखी गुढी!

मुणगे येथे शालेय विद्यार्थ्यांनी उभारली अनोखी गुढी!

79

मसुरे प्रतिनिधि:(पेडणेकर): त्रिपुरा फाऊंडेशन इंडियाच्या माध्यमातून विविध राज्यांमध्ये चालविण्यात येणांऱ्या होप स्टेशनच्या माध्यमातून देवगड तालुक्यातील मुणगे गावातील आडवळवाडी होप स्टेशनमध्ये हिंदू नववर्षाचा सण गुढीपाडवा आणि नवीन वर्षाचे स्वागत गुढी उभारून मोठ्या जल्लोषात विद्यार्थ्यांनी केले. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मुलांनी पारंपरिक पोशाख परिधान केला होता.

आंब्याची पाने, कडूनिंबू झंडू – चाफ्याच्या फूलांचे हार, कलश धावून गुढी उभारली होती. पारंपरिक रांगोळी काढण्यात आली होती. शिक्षकांनी गुढी उभारण्याचे महत्व मुलांना सांगितले. त्यानंतर मुलांच्याकडून गुढीची विधिवत पूजा झाली. सर्वच मुले मोठया आनंदात, उत्साहात सहभागी झाली होती. या फाऊंडेशन मार्फत मुणगे येथे नेहमीच सर्व सण-उत्सव मोठ्या उत्साहात व आनंदात साजरे केले जातात. नववर्षाच्या स्वागत कार्यक्रम प्रसंगी होपस्टेशनचे कृतिका बोरकर, पूर्वा रासम, रिया रासम, विदित रासम, हितेश नाटेकर, निशांत रासम, रजत रासम, वैष्णवी रासम, देविका रासम, राखी लब्दे, सुहानी लब्दे, शर्वरी लब्दे, कार्तिकी लब्दे, वेदांती पुजारे, हर्षला रूपे, देवांग मेस्त्री, गायत्री मेस्त्री, विनायक मेस्त्री हे विद्यार्थी आणि शिक्षिका कु. सुविधा बोरकर उपस्थित होते.