Home स्टोरी मुणगे येथे यशस्विनी प्रतिष्ठान आणि संघर्ष मित्र मंडळाच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप!

मुणगे येथे यशस्विनी प्रतिष्ठान आणि संघर्ष मित्र मंडळाच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप!

191

मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): मुणगे येथे यशस्विनी प्रतिष्ठान आणि संघर्ष मित्र मंडळ आडबंदर,मुंबई यांच्या सौजन्याने श्री भगवती हायस्कूल आणि कै. वीणा सुरेश बांदेकर ज्युनिअर कॉलेज मधील दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. याप्रसंगी यशस्विनी प्रतिष्ठानच्या सल्लागार सौ. रवीना मालाडकर,सौ.अंजली सावंत, सौ.देवयानी राणे, श्री.तुषार आडकर, श्री.योगेश लब्दे, श्री.शिवदास रासम श्री.अशोक सावंत आणि पालक समिती यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. पुढील शैक्षणिक वर्षासाठी खूप शिका मोठे व्हा आपल्या आईवडिलांचे, शिक्षकांचे नाव मोठे करा आणि ज्या शाळेमध्ये शिकलात त्या शाळेची आठवण, आपुलकी, अभिमान नेहमी तुमच्या हृदयात जपून ठेवा अशा शुभेच्छा देण्यात आल्या. शाळेचा मुख्याध्यापिका श्रीमती. एम. बी. कूंज,सौ. गौरी तवटे ,श्री.प्रसाद बागवे, श्री. एन जी विरकर, हरीश महाले, सौ कुमठेकर उपस्थित होते. यशस्विनी प्रतिष्ठान आणि संघर्ष मित्र मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले.