Home स्टोरी मुणगे तिठा येथे सोलर हायमास्ट दिव्याचे भूमीपूजन!आम. नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य

मुणगे तिठा येथे सोलर हायमास्ट दिव्याचे भूमीपूजन!आम. नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य

417

मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): मुणगे येथील श्री भगवती हायस्कूल तिठा येथे आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या निधीतून मंजूर झालेल्या सोलर हायमास्ट दिव्याचे भूमीपूजन सरपंच सौ. साक्षी गुरव यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. सदर ठिकाणी हायमास्ट दिवा लागावा यासाठी गेली चार – पाच वर्षे ग्रामस्थातून  मागणी केली जात  होती. यासाठी ग ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी अनेक वेळा हायमास्ट दिव्याची मागणी करून ठराव केले होते. याबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते व मुणगे सोसायटी चेअरमन गोविंद सावंत, सरपंच सौ साक्षी गुरव यानी आमदार नितेश राणे यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता.  

आमदार नितेश राणे यानी सोलर हायमास्ट दिव्यासाठी चार लाख नव्वद हजाराचा निधी मंजूर करून दिला आहे. आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने येथील ग्रामस्थांनी आमदार नितेश राणे याना दीर्घायुष्य लाभो व मुणगे गावातील विकास कामासाठी भरघोस असा निधी त्याच्याकडून मिळत रहावा अशी भगवती चरणी प्रार्थना गोविंद सावंत यानी ग्रामस्थांच्या वतीने केली. वाढदिवसाचे औचित्य साधून आज या सोलर हायमास्ट दिव्याचे भूमीपूजन मुणगे सरपंच सौ साक्षी गुरव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गोविंद सावंत, उपसरपंच संजय घाडी, माजी ग्रामपंचायत सदस्य कृष्णा ऊर्फ दादा सावंत, राजू पुजारे, प्रकाश सावंत, अजित रासम, आशिष आईर, सुनील बोरकर, श्रीमती प्रभात सावंत, श्री बागवे, तसेच ठेकेदार श्री शेखआदी ग्रामस्थ उपस्थित होते.