Home राजकारण मुख्यमंत्री शिंदे आणि ठाकरे यांची अशी कोणतीही भेट झालेली नाही! श्रीकांत शिंदे

मुख्यमंत्री शिंदे आणि ठाकरे यांची अशी कोणतीही भेट झालेली नाही! श्रीकांत शिंदे

109

सिंधुदुर्ग: दोन दिवसापूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा तेजस ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असल्याची बातमी समोर आली होती. या बातमीवरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती. यावर आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. या संदर्भात खासदार श्रीकांत शिंदे यांनी ट्विट केलं आहे. यात त्यांनी रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे साहेब यांना मा.उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा तेजस ठाकरे भेटल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी प्रसिध्द केले आहे. हे वृत्त निराधार आणि खोटं असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि ठाकरे यांची अशी कोणतीही भेट झालेली नाही. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारे वृत्तांकन करण्यापूर्वी प्रसारमाध्यमांनी त्याची सत्यता पडताळायला हवी. उगाच सनसनाटी निर्माण करण्यासाठी खोट्या बातम्या प्रसिद्ध करणे माध्यमांकडून अपेक्षित नाही, लोकांना खरी माहिती देण्याची जबाबदारी असलेल्या माध्यमांनी खोट्या सूत्राचा आधार घेणे अपेक्षित नाही. त्यातून माध्यमांचीच विश्वासार्हता धोक्यात येते, हे ध्यानात घ्यावे, असंही श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे.