Home राजकारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा ही ‘ढ’ विद्यार्थ्यांची होती! भास्कर जाधव

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा ही ‘ढ’ विद्यार्थ्यांची होती! भास्कर जाधव

74

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा ही ‘ढ’ विद्यार्थ्यांची होती. उद्धव ठाकरेंची सभा ५ मार्चला त्याच मैदानावर झाली. त्यामुळे आमच्या सभेचा विक्रम आणि उच्चांक त्यांच्या डोळ्यांसमोर होते. त्याासाठी अर्ध्या महाराष्ट्रातून लोकं आणली गेली. तरीदेखील आमच्या सभेच्या जवळपास येऊ शकले नाहीत. म्हणून त्यांना ‘ढ’ विद्यार्थी म्हणतो, अशी खोचक टीका ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना केली आहे. भास्कर जाधव म्हणाले, “गेले आठ महिने रामदास कदमांकडून एकही नवीन मुद्दा उपस्थित केला जात नाही. मला आणि माझ्या मुलाला कसं संपवलं, हेच सांगतात. काल म्हटलं, मी विरोधी पक्षनेता होतो, म्हणजे पुढचा मुख्यमंत्री झालो असतो. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मला पाडलं. रामदास कदम मुख्यमंत्री झाले तर ही सर्वात मोठी चेष्ठा असेल. म्हणून रामदास कदमांना आता कोकणातील जोकर ही नवीन उपमा देण्याची गरज आहे.”मातोश्रीची दार उघडी ठेवल्यावर बाकीचे सुद्धा निघून जात फक्त पितापुत्र राहतील, असं एकनाथ शिंदेंनी सभेत म्हटलं. याबद्दल विचारलं असता भास्कर जाधवांनी सांगितलं, “उद्धव ठाकरेंचा पक्ष शिल्लक राहील की नाही, त्याची काळजी तुम्ही कशाला करता. तुम्ही पक्षाचं चिन्ह आणि नाव घेतलं ते कसं टिकेल याची काळजी केली पाहिजे. पक्ष चिन्ह आणि नाव उद्धव ठाकरेंना मिळणार, हे सर्वांना माहिती आहे.”“भाजपाने लिहलेली स्क्रीप्ट मुख्यमंत्री बोलत होते. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांचा मोठेपणा, ३७० कलम, राममंदिर यावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं. राममंदिर काय भाजपाने बांधलं का?”, असा सवाल भास्कर जाधवांनी उपस्थित केला.उद्धव ठाकरेंच्या सभेला आलेली लोक त्यांना पाठिंबा, आशीर्वाद देण्यासाठी आले होतं. ते शेवटपर्यंत राहिले. यांच्या सभेला आलेली लोक पाठीमागं लागत आणि आमिष दाखवून आणली होती. ती सर्व लोक मुख्यमंत्र्यांच्या सभेला पाठ फिरवून निघून गेली. असेही ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांनी म्हटलं.