Home क्राईम मुंबई पोलिसांकडून एका आलिशान हॉटेलवर छापा! एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

मुंबई पोलिसांकडून एका आलिशान हॉटेलवर छापा! एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

103

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: मुंबई पोलिसांनी शुक्रवारी गोरेगाव परिसरातील एका आलिशान हॉटेलवर छापा टाकून एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. पोलिसांनी घटनास्थळावरून एका प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्रीला अटक केल्याचा तसेच तीन मॉडेल्सची सुटका केल्याची माहिती दिली आहे. २४ वर्षीय भोजपुरी अभिनेत्री सुमन कुमारीला मुंबई पोलिसांनी काल रात्री (२१ एप्रिल २०२३ रोजी) अटक केली आहे. तिच्यावर मुलींना वेश्याव्यवसायात ढकलल्याचा आरोप आहे. पोलिसांनी तीन मॉडेल्सचीही सुटका केली आहे. सध्या पुढील तपास पोलीस करत आहेत.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुप्त माहितीच्या आधारे पोलीस पथकाने शुक्रवारी संध्याकाळी हॉटेलच्या खोलीवर छापा टाकला असता २४ वर्षीय भोजपुरी अभिनेत्री एजंट म्हणून काम करत होती आणि मॉडेल्सना वेश्याव्यवसायात ढकलत होती. अटक केलेली अभिनेत्रीने भोजपुरी चित्रपटांमध्ये काम करण्यासोबतच हिंदी, पंजाबी आणि इतर प्रादेशिक भाषांमधील ओटीटी शो आणि गाण्याच्या अल्बममध्ये केले आहे.

भोजपुरी अभिनेत्री सुमन कुमारी

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अधिकाऱ्याला वेश्याव्यवसायाची माहिती मिळाली होती. यानंतर कारवाई करून गोरेगाव येथील रॉयल पाम हॉटेलवर छापा टाकण्यात आला, जिथे वेश्याव्यवसायासाठी अनेक मॉडेल्सचा पुरवठा केला जात होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘या महिला चित्रपटात करिअर करण्यासाठी शहरात आल्या होत्या. त्या कठीण काळातून जात होत्या आणि त्यांना जीवनशैली टिकवून ठेवण्यासाठी पैशांची गरज होती.’ पण पोलिसांनी या प्रकरणात सगळ्यानांच रंगेहाथ पकडलं आहे.सुमनला पोलिसांनी अटक केली आहे. आता पोलीस जो सुमन आणि क्लायंटमध्ये काम करणाऱ्या मध्यस्थाचा शोध घेत आहेत. सुमन कुमारीबद्दल बोलायचे तर ती अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे. तिने ‘लैला मजनू’ आणि ‘बाप नंब्री, बेटा दस नंब्री’ यांसारख्या अनेक भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री असण्यासोबतच सुमन एक गायिका देखील आहे, तिने हिंदी, पंजाबी आणि भोजपुरीसह अनेक भाषांमध्ये गाणीही गायली आहेत.