Home स्टोरी मुंबई-पुणे द्रुतगती एक्सप्रेस हायवे ठरतोय मृत्यूचा सापळाच

मुंबई-पुणे द्रुतगती एक्सप्रेस हायवे ठरतोय मृत्यूचा सापळाच

67

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: मुंबई-पुणे द्रुतगती एक्सप्रेस हायवे हा जणू काही मृत्यूचा सापळाच ठरत आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून या महामार्गावर वारंवार अपघात घडत आहेत. या महिन्यातच या महामार्गावर तीन ते चार मोठे अपघात घडले. आजसुद्धा एक भीषण अपघात घडला आहे. तब्बल १२ वाहने एकमेकांवर धडकली आहेत. यामुळे प्रचंड मोठी वाहतुकीचे कोंडी झाली. मुंबई – पुणे महामार्गावर खोपोलीजवळ एक विचित्र अपघात घडला असून यात एकूण १२ वाहने एकमेकांना धडकली. खोपोली एक्झिटजवळ हा अपघात घडला आहे. सुदैवाने या अपघातात कुणीही दगावले नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र या अपघातात चार महिला जखमी झाल्या असल्याचे सांगण्यात आले आहे.

पुणे-मुंबई महामार्गावरील बोरघाटात गेल्या काही दिवसांत अनेक अपघातांची नोंद करण्यात आली आहे. आज देखील ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा विचित्र अपघात घडला. यामध्ये ट्रकने तब्बल १२ वाहनांना धडक दिली. परंतु या घटनेनंतर ट्रक चालक हा घटना स्थळावरून पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे.पुणे-मुंबई महामार्गावरील बोरघाटात गेल्या काही दिवसांत अनेक अपघातांची नोंद करण्यात आली आहे. आज देखील ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा विचित्र अपघात घडला. यामध्ये ट्रकने तब्बल १२ वाहनांना धडक दिल्यानंतर ट्रक चालक हा घटना स्थळावरून पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक वाहन चालक नियम मोडत वाहन चालवत असल्याने या महामार्गावर अपघातात वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. रायगड पोलिसांकडून या वाहन चालकाचा शोध घेण्यात येत आहे. बोरघाटाच्या उतारावर हा अपघात घडल्याने यामध्ये मोठ्या संख्येने वाहनांचे नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेतील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेमुळे मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दोन दिवसांपूर्वी सुद्धा याच मार्गावर ट्रक आणि बसचा अपघात झाला होता. या अपघातात देखील चार जणांना आपला जीव गमवावा लागला होता .