Home स्टोरी मुंबई – गोवा महामार्गावर जाणवली ब्रिजवर इर्टीगा कार अपघात….!

मुंबई – गोवा महामार्गावर जाणवली ब्रिजवर इर्टीगा कार अपघात….!

382

कणकवली: मुंबई – गोवा महामार्गावर जाणवली ब्रिजवर इर्टीगा कार (एम. एच. ४३ बी. यू. ७७६६) कारला मागवून येणाऱ्या १६ चाकी कंटेनरची धडक बसून अपघात झाला. या अपघातात इर्टीगा कारचे  मोठे नुकसान झाले आहे. धडक बसून इर्टीगा कार ही हायवेच्या बाजूला असलेल्या डिव्हायडरवर चढली. घटनास्थळी कणकवली  वाहतूक पोलीस हवालदार दाखल झाले आहेत. आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी देखील घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. याबाबत कणकवली पोलीस अधिक तपास करत आहेत.