Home स्टोरी मुंबई – गोवा महामार्गाच्‍या कामाच्‍या पूर्ततेअभावी रायगडमधील पत्रकारांचे १२ सप्‍टेंबरला आंदोलन !

मुंबई – गोवा महामार्गाच्‍या कामाच्‍या पूर्ततेअभावी रायगडमधील पत्रकारांचे १२ सप्‍टेंबरला आंदोलन !

123

रायगड:  मुंबई – गोवा महामार्गाच्‍या कामाच्‍या पूर्ततेअभावी रायगडमधील पत्रकार १२ सप्‍टेंबर या दिवशी शांततेच्‍या मार्गाने आरती जागर आंदोलन करणार आहेत. ९ ऑगस्‍टला पत्रकारांनी बोंबाबोंब आंदोलन केले होते. त्‍यानंतर मंत्री रवींद्र चव्‍हाण यांनी १० सप्‍टेंबरपर्यंत रस्‍त्‍यावरील खड्डे भरण्‍याचे आणि एक मार्ग पूर्ण करण्‍याचे आश्‍वासन दिले होते; पण कामाचा वेग पहाता हे काम गणेशचतुर्थीपूर्वी पूर्ण होणार नाही. त्‍यामुळे याच्‍या निषेधार्थ आंदोलन करण्‍यात येणार आहे. या वेळी खड्ड्यावरील गाण्‍याचा कलगीतुराही खड्ड्यात बसून केला जाणार आहे. ‘या आंदोलनात पत्रकार आणि जनता यांनी सहभागी व्‍हावे’, असे आवाहन रायगड प्रेस क्‍लबचे अध्‍यक्ष मनोज खांबे यांनी केले आहे.