Home राजकारण मुंबईतील वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे कार्यालय नवी दिल्ली येथे हलविण्याचा कुठलाही निर्णय केंद्र सरकारने...

मुंबईतील वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे कार्यालय नवी दिल्ली येथे हलविण्याचा कुठलाही निर्णय केंद्र सरकारने घेतलेला नाही! देवेंद्र फडणवीस

109

मुंबईतील वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे कार्यालय नवी दिल्ली येथे हलविण्याचा कुठलाही निर्णय केंद्र सरकारने घेतलेला नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले. वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालय महाराष्ट्रातून दिल्लीला हलविण्यात आल्याचे एक पत्र पोस्ट करून काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी ट्विट केले होते. हा मुद्दा राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत उपस्थित केला. त्यावर निवेदन करताना फडणवीस म्हणाले की, वस्त्रोद्योग आयुक्त व पाच अधिकाऱ्यांना दिल्लीला येण्यास सांगितले आहे.या मंत्रालयाची फेरबांधणी व या क्षेत्राला चालना देण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. या आयुक्तालयात ५०० अधिकारी-कर्मचारी आहेत. त्यामुळे संपूर्ण आयुक्तालय दिल्लीत हलविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असे म्हणणे चुकीचे आहे. मुंबईतील वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालय दिल्लीला हलविण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही.