मुंबईच्या दहीसर परिसरात भाजप आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते यांच्यात मोठा राडा झाल्याची बातमी समोर येत आहे. भाजप कार्यकर्ता बिभिषण वारे यांना मारहाण करण्यात आली आहे. शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप बिभिषण वारे यांनी केला आहे. बिभिषण वारे यांनी तीन महिन्यांपूर्वी भाजपात प्रवेश केला आहे. तर नवनाथ नवाडकर यांनी तीन दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सूर्वे यांचा बॅनर काढून नवाडकार यांच्या पक्ष प्रवेशाचे बॅनर लावल्यावरून हा वाद झाला अशी माहिती मिळते. या वादातूनच ही मारहाण झाल्याचे समजते. या प्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.