Home स्टोरी मिठबाव येथे १३ रोजी तिरंगी भजनबारी सामना…!

मिठबाव येथे १३ रोजी तिरंगी भजनबारी सामना…!

137

मसुरे प्रतिनिधी: मिठबाव उत्कटवाडी येथील श्री देव गणपती देवस्थान येथे १३ फेब्रुवारी रोजी माघी श्री गणेश जयंती उत्सव निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी गणेश पूजन, अभिषेक, आरती, दुपारी १२ ते ३ पर्यंत महाप्रसाद, सायंकाळी स्थानिक भजने, आरती, आणि रात्री ९.३० वाजता तिरंगी भजन बारीचा सामना आयोजित करण्यात आला आहे. श्री हनुमान प्रसादिक भजन मंडळ वर्दे तालुका कुडाळचे बुवा विजय उर्फ गुंडू सावंत विरुद्ध श्री लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ भरणी तालुका कुडाळचे बुवा श्री विनोद चव्हाण, विरुद्ध तासलेदेव प्रासादिक भजन मंडळ मालवण मसुरे बुवा श्री संजय गावडे या तीन भजनी बुवांमध्ये हा तिरंगीभजन बारीचा सामना होणार आहे. बुवा विजय सावंत यांना पखवाज साथ विराज बावकर तर तबला श्रावण आंबेरकर, बुवा विनोद चव्हाण यांना पखवाज साथ तुषार लोट, तबला शिवराज पोईपकर आणि बुवा संजय गावडे यांना पखवाज साई गावडे, तबला ओंकार थवी हे साथ करणार आहेत. उपस्थितीचे आवाहन श्री देव गणपती देवस्थान उत्कटवाडी मिठबाव यांनी केले आहे.