कल्याण प्रतिनिधी: (आनंद गायकवाड): – कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सभागृहातील एके काळच्या कल्याण पूर्वेतील तोफ म्हणून ओळख असलेल्या दिवंगत माजी नगरसेविका निर्मलाताई रायभोळे यांचे स्मृती दिनी नेहरूनगर प्रभागातील ६०० हून अधिक महिलांना विनामुल्य साड्यांचे वाटप करण्यात आले. माजी शिक्षण मंडळ सभापती आणि फुले शाहू आंबेडकर विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष महादेव रामभोळे यांच्या पत्नी दिवंगत निर्मला ताई रामभोळे यांच्या स्मृतीस अभिवाद करण्यासाठी नेहरू नगर प्रभागात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. श्री गोपाळ लांडगे यांचे हस्ते उपस्थित महिलांना ६००हून अधिक साड्यांने वाटप करण्यात आले. या समयी उपस्थितांना संबोधीत करतांना गोपाळ लांडगे यांनी निर्मलाताई रायभोळे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी केलेल्या कतृत्वाचे कौतुक केले तर निर्मलाताई रामभोळे यांच्या कार्याचा वसा आजही रामभोळे पिता पुत्र करीत असल्याचे सांगितले तसेच दयानंद रामभोळे याने सक्रीय राजकारणात येण्याचे आवाहनही केले .या समयी महादेव भिसे, अशोक पवार ,दिनकर लांडगे ,महादेव चव्हाण , चौरे , दयानंद रायभोळे, साई सावंत, गणेश जोंधळे , सुनिल उज्जेनकर, अनिल येरसाने, पांडू पवार, सिद्धार्थ भिसे, सिद्धु कोरडे, वैभव पाखरे, नवीन तौसाळकर, बंडी पवार, निखिल तौसाळकर, ईस्माईल शेख, मेहराज खान, महिला आघाडीच्या मोनिका रायभोळे, वंदना पाखरे, दिपा पाखरे, सुनिता सादंत , योशोदा जोंजाळे, छाया घोडके, हर्षा भिसे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Home स्टोरी मा. नगरसेविका स्व. निर्मलाताई रायभोळे यांच्या स्मरणार्थ नेहरू नगर प्रभागात साड्यांचे वाटप