माहूरगड ब्युरोनुज: अक्कलकोट येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व मा.नगरसेवक महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांनी मित्रपरिवारासह नांदेड जिल्ह्यातील माहूरगड रेणुका देवी मंदीर व मंदीर संस्थानास भेट देवून रेणूका मातेचे दर्शन घेतले. याप्रसंगी रेणुका देवी मंदीर संस्थानच्या वतीने संस्थानचे पुजारी व विश्वस्त बालाजी जगत यांनी महेश इंगळे-प्रथमेश इंगळे यांचा रेणूका मातेचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सन्मान केला. यावेळी बोलताना महेश इंगळे यांनी हिंदू सनातन धर्माचा अभिमान असलेल्या प्रयागराज महाकुंभमेळ्यात शाही स्नान करुन परतीच्या वाटेवर असताना आज रेणूका मातेच्या दर्शनाचा योग आला. महाकुंभ मेळ्यातील शाही अमृत स्नान, व परतीच्या वाटेवर शेगांव गजानन महाराज, माहूर रेणूका मातेचे दर्शन, माहूर दत्त शिखर देवस्थान दत्त दर्शन, औंढा नागनाथ दर्शन घेऊन व उपस्थित मित्र परिवार सदस्यांना या तिर्थक्षेत्रांचे दर्शन घडविल्याचा आनंद शब्दात अवर्णनीय आहे. आज येथील रेणूका मातेच्या दर्शनानंतर माहूरगड रेणुका देवी संस्थांच्या कामकाजाची व दर्शन व्यवस्थेची तसेच श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या कामकाजाच्या माहिती संदर्भात माहूरगड रेणुका देवी संस्थानचे विस्वस्त व पुजारी बालाजी जगत यांच्याशी चर्चा केली.
यावेळी माहूरगड रेणुका देवी संस्थानचे व्यवस्थापक योगेश गुरव-साबळे, सहाय्यक व्यवस्थापक नितीन गेडान, महेश इंगळे-प्रथमेश इंगळे मित्र परिवारच्या प्रयागराज महाकुंभमेळा ग्रुपचे सदस्य संतोष पराणे, श्रीकांत झिपरे, अंकूश केत, बाळासाहेब एकबोटे, सुनिल पवार, मनोज इंगुले, ज्ञानेश्वर भोसले, सुरेश वाले, संजय पवार, श्रीशैल गवंडी, सागर गोंडाळ, धनराज स्वामी, दर्शन घाटगे, तुषार मोरे, स्वामीनाथ मुसळे इत्यादी उपस्थित होते.