Home स्टोरी माहिमच्या वादग्रस्त मजारीच्या ठिकाणी मुंबई महापालिकेचं अतिक्रमण विरोधी पथक दाखल!

माहिमच्या वादग्रस्त मजारीच्या ठिकाणी मुंबई महापालिकेचं अतिक्रमण विरोधी पथक दाखल!

125

मुंबई: मुंबईतील माहीम समुद्रात अनधिकृत बांधकाम करत दुसरी हाजी अली करण्याचा डाव असल्याचा व्हिडिओ दाखवत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इशारा दिला होता. राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर जिल्हा प्रशासन जागे झाले आणि रात्रीत कारवाई करण्याबाबत आदेश काढले. सकाळी ८ वाजता माहीमसमुद्रातील अनधिकृत बांधकामाची पाहणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले.

राज ठाकरे

माहिमच्या वादग्रस्त मजारीच्या ठिकाणी मुंबई महापालिकेचं अतिक्रमण विरोधी पथक दाखल झाले आहे. गेल्या दोन वर्षात मजारीभोवती अनधिकृत बांधकाम करण्यात आलं आहे. केवळ हेच बांधकाम आज पाडण्यात येणार आहे. मजारीला हात लावला जाणार नाही. माहिम समुद्रातील कथित मजारीचं मॅपिंग करण्यात आलं आहे. महाराष्ट्र मॅरिटाईम बोर्डाचे अधिकारी माहीम समुद्रातील ठिकाणावर पोहोचले आहेत. राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मॅरिटाईम बोर्डाला जाग आल्याचे बोलले जात आहे. माहिमच्या वादग्रस्त मजारीच्या ठिकाणी मुंबई महापालिकेचं अतिक्रमण विरोधी पथक दाखल झालं आहे. तसेच एक जेसीबी देखील त्या ठिकाणी तयार ठेवली आहे. दरम्यान, माहीम समुद्रामधील या ठिकाणावर माहिम दर्गा ट्रस्टनं मोठा दावा केला आहे. ही जागा ६०० वर्षं जुनी आहे. राज ठाकरे म्हणतात त्याप्रमाणं ती आताच बांधलेली नाही. मुळात, हजरत मकदूम अली शाह हे याच जागी बसून हजरत ख्वाजा खिजर अली शाह यांच्याकडून शिक्षण घ्यायचे. ही ऐतिहासिक जागा आहे. तिथं दर्गा उभारण्याचा आमचा कुठलाही विचार नाही. असं माहीम दर्ग्याचे विश्वस्त सुहेल खंडवानी यांनी सांगितलं.