Home स्टोरी मालवण पत्रकार समिती अध्यक्षपदी संतोष गावडे, उपाध्यक्षपदी कृष्णा ढोलम, दत्तप्रसाद पेडणेकर

मालवण पत्रकार समिती अध्यक्षपदी संतोष गावडे, उपाध्यक्षपदी कृष्णा ढोलम, दत्तप्रसाद पेडणेकर

80

मालवण प्रतिनिधी: मालवण तालुका पत्रकार समितीच्या २०२३ ते २०२५ या दोन वर्ष कालावधीच्या कार्यकारणीत अध्यक्षपदी संतोष गावडे तर उपाध्यक्ष तर सचिवपदी सौगंधराज बांदेकर यांची निवड करण्यात आली. निवडणूक निरीक्षक दाजी नाईक, राजेंद्र मुंबरकर यांनी ही निवड जाहीर केली. मालवण तालुका पत्रकार समितीची अध्यक्ष व सर्व कार्यकारिणीच्या निवड प्रक्रियेसाठी कुंभारमाठ येथील हॉटेल जानकी येथे शुक्रवारी बैठक घेण्यात आली. बैठकीस निवडणूक निर्णय निरीक्षक म्हणून जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दाजी नाईक, राजेंद्र मुंबरकर, कोकण विभागीय सचिव नंदकिशोर महाजन, जिल्हा उपाध्यक्ष विद्याधर केनवडेकर, महेश सरनाईक आदी उपस्थित होते.

उपाध्यक्ष- कृष्णा ढोलम
उपाध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर
सचिव सौगंधराज बांदेकर
खजिनदार- सिद्धेश आचरेकर

यावेळी निवडण्यात आलेली उर्वरित कार्यकारिणी – उपाध्यक्ष- कृष्णा ढोलम, दत्तप्रसाद पेडणेकर, सहसचिव- संदीप बोडवे, खजिनदार- सिद्धेश आचरेकर, सदस्य- कुणाल मांजरेकर, गणेश गावकर, नितीन गावडे, प्रशांत हिंदळेकर, उदय बापर्डेकर, अमित खोत, सुधीर पडेलकर यांची निवड करण्यात आली.यावेळी निवडण्यात आलेल्या नूतन कार्यकारिणीचे निवडणूक निर्णय निरीक्षक दाजी नाईक, राजेंद्र मुंबरकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

यावेळी आप्पा मालंडकर, संग्राम कासले, प्रफुल्ल देसाई, नितीन आचरेकर, शैलेश मसुरकर, अमोल गोसावी, परेश सावंत, समीर म्हाडगुत, अर्जुन बापर्डेकर, पी. के. चौकेकर, अनिल तोंडवळकर, मनोज चव्हाण, महेश कदम, महेंद्र पराडकर आदी सदस्य उपस्थित होते.