मसुरे प्रतिनिधी: कै.सौ.वर्षा विश्वास मोंडकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्री.विश्वास नारायण मोंडकर यांजकडून साडे तीन हजार रु.किंमतीच्या दुरेघी,चौरेघी व एकेरी वह्यांचे मालवण दांडी शाळेतील सर्व ४४ विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात आले.यावेळी व्यासपिठावर श्री.विश्वास नारायण मोंडकर,श्री.सचिन मालंडकर,श्री.रुपेश धुरी,सौ.कुबल,सौ.सौ.मनीषा ठाकुर मँडम,सौ.अमृता राणे मँडम,मुख्याध्यापिका सौ.विशाखा चव्हाण मँडम,राज्यपुरस्कार प्राप्त पदविधर शिक्षक तथा मालवण केंद्रप्रमुख श्री.शिवराज सावंत सर उपस्थित होते.
यावेळी दानशुर व्यक्तीमत्व श्री.विश्वास मोंडकर व मुख्याध्यापिका सौ.विशाखा चव्हाण मँडम यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या . कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री.शिवराज सावंत यांनी केले,तर आभार सौ.मनिषा ठाकुर यांनी मानले.