Home स्टोरी मालवण तहसिलदार आक्रमक तर इतर तालुक्यातील तहसीलदार मात्र गप्प!६ वाळू डंपर पकडले

मालवण तहसिलदार आक्रमक तर इतर तालुक्यातील तहसीलदार मात्र गप्प!६ वाळू डंपर पकडले

86

मालवण:- अनधिकृत वाळू वाहतूक प्रकरणी मालवण तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथकाची धडक कारवाई मालवण तालुक्यातील मार्गांवर सुरूच आहे. बुधवारी रात्री तहसीलदार श्रीधर पाटील यांनी आचरा देवगड व तोंडवळी -वायंगणी सडा मार्गावर केलेल्या कारवाईत अनधिकृत वाळू वाहतूक करणारे सहा डंपर पकडले. सहाही डंपर आचरा पोलीस ठाणे परिसरात आणण्यात आले आहेत. मालवण तहसील कार्यालयाच्या माध्यमातून डंपरवर पुढील कारवाई करण्यात येईल. अशी माहिती तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली आहे.