Home स्टोरी मालवण किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळला..! ठेकेदार आणि प्रशासनाच्या निर्लज्जपणामुळे शिवभक्तांमध्ये...

मालवण किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळला..! ठेकेदार आणि प्रशासनाच्या निर्लज्जपणामुळे शिवभक्तांमध्ये नाराजी.

189

सिंधुदुर्ग: जिल्हा प्रशासन तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारला लाज वाटावी अशी दुर्दैवी घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडलेली आहे. मालवण सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारून मोठा कार्यक्रम केल्यानंतर एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांकडून आणि शिवभक्तांकडून संबंधित ठेकेदारावर योग्य ते कारवाई झाली पाहिजे तसेच अटक हि झाली पाहिजे अशी मागणी करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा जर कोसळू शकतो तर यावरून प्रशासन आणि बांधकाम ठेकेदार सिंधुदुर्ग जिल्ह्यात कशा प्रकारे काम करत आहेत हे दिसून येत आहे. यावरून इतर कामांची काय अवस्था काय असेल?  ठेकेदार कसे बोगस काम करून लुटत आहेत आणि यात प्रशासकीय अधिकाऱ्यांचाही कसा हात? हे समजून घेणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचाच पुतळा कोसळला यावरून सिद्ध होत आहे की कोणती हि लाज न बाळगता निर्लज्जपणे आज प्रशासकीय ठेकेदार काम करत आहेत आणि त्यांना सरकार आणि प्रशासन बिनधास्तपणे पेमेंट वाटत आहेत. यावरून किती भ्रष्टाचार आणि किती फालतुगिरी चालू आहे? याची दुसरे उदाहरण मिळू शकत नाही.

४ डिसेंबर २०२३ रोजी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोर राजकोट परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं. पुतळा उद्घाटनानंतर मालवणात युद्धनौकांद्वारे प्रात्यक्षिके करण्यात आली होती. या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह विधानसभा अध्यक्ष, स्थानिक खासदार, आमदार उपस्थित होते. त्यामुळे राज्य सरकार,  केंद्र सरकार आणि प्रशासकीय अधिकारी संबंधित ठेकेदारावर कोणत्या प्रकारे कारवाई करतात? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.