६ ऑक्टोबर वार्ता: देशातील वेगवान आणि आरामदाई प्रवासासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘वन्दे भारत एक्सप्रेस’मध्ये आता स्लीपर कोचही असणार आहेत. सध्या देशातील विविध भागांत धावणार्या ३३ वन्दे भारत रेल्वेगाड्यांत केवळ बसून प्रवास करण्याची व्यवस्था आहे. आता मात्र झोपून प्रवास करता येईल, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. या गाडीचे ‘स्लीपर कोच’ हे राजधानी एक्सप्रेससारख्या ‘प्रीमियम गाडी’पेक्षाही अत्यंत विशेष आणि आकर्षक असतील, असे वैष्णव म्हणाले.सध्या भारतात ३३ वन्दे भारत रेल्वेगाड्या धावत असून बैठी आसन सुविधा असलेल्या एकूण ७५ वन्दे भारत गाड्या चालवल्या जाणार आहेत. यानंतर या गाड्यांचे उत्पादन थांबवण्यात येईल. सरकारने ‘वन्दे भारत मेट्रो’चीही सिद्धता केली आहे. या गाडीचे प्रारूप हे या वर्षी डिसेंबरपर्यंत सिद्ध होऊ शकते. वन्दे मेट्रोला १२ डबे असतील.