सावंतवाडी:
वृत्तपत्र व सोशल मीडियावरील बातमी वाचून मातोंड हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री.विजय पुंडलिक मांजलकर गाव लोरे, ता. वैभववाडी येथून येऊन माय बापाचा आधार हरपलेल्या डिमेलो दिव्यांग भगिनींना रोख रुपये दहा हजार देऊन आर्थिक मदत केली. तसेच मांजलकर सर सामाजिक भान राखून गोरगरिबांना मदत करत असतात.
सामाजिक बांधिलकीची सचिव समीरा खलील, रवी जाधव व रुपा मुद्राळे यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्याचप्रमाणे शहरातील दानशूर व्यक्ती त्या भगिनींसाठी जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी पुढाकार घेत आहे त्यांचेही आभार सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री सतीश बागवे यांनी मानले आहे.