सावंतवाडी प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन संलग्न श्रीवास लॅबोरेटरी क्लिनिक माणगाव आणि कलंगुटकर आयुर्वेद क्लिनिक आणि पंचकर्म सेंटर सावंतवाडी यांच्या पुढाकारांने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात रुग्णांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. आयुर्वेद तज्ञ डॉ. दीप्ती कळंगुटकर यांच्या उपस्थितीत हे मोफत तपासणी शिबीर संपन्न झाले.

या शिबिराचा ११२ रुग्णांनी लाभ घेतला. तसेच रुग्णांना मोफत औषध उपचार वाटप करण्यात आले.

यावेळी टाळंबा प्रकल्प अध्यक्ष ऍड.किशोर शिरोडकर,माजी उपसभापती आर के सावंत,बाळा केसरकर माणगाव, उपसरपंच बापू बागवे, संभाजी ब्रिगेड संघटना तालुका अध्यक्ष प्रसाद नार्वेकर, डॉ.दिप्ती कळंगुटकर, सौ.सुप्रिया पाटणेकर, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर सरचिटणीस राकेश केसरकर, महीला सेल अध्यक्षा सौ.दर्शना केसरकर, उपाध्यक्ष मिलिंद धुरी, व्यापारी सेल अध्यक्ष बाळा कोरगांवकर, आनंद कांडरकर, कृष्णा सावंत आणि नामदेव जानकर उपस्थित होते.