Home स्टोरी माणगाव गोटूसवाडी येथील एकाच कुटुंबीयातील पाच व्यक्तींना विषारी आळंबी खाल्ल्याने विषबाधा.

माणगाव गोटूसवाडी येथील एकाच कुटुंबीयातील पाच व्यक्तींना विषारी आळंबी खाल्ल्याने विषबाधा.

125

माणगाव गोटूसवाडी येथील एकाच कुटुंबीयातील पाच व्यक्तींना विषारी आळंबी खाल्ल्याने विषबाधा.

 

 

माणगाव गोटूसवाडी येथील एकाच कुटुंबीयातील पाच व्यक्ती विषारी आळंबी खाल्ल्याने विषबाधा झाली. सुभाष पवार 36 शीला पवार 30, सुप्रिया पवार 8, सावंन पवार 10 व चंद्रशेखर स्वामी 40 अशी त्यांची नावे आहेत.

घराच्या बाजूला लागलेली आळंदी खाल्याने त्यांना दुपारी दोनच्या सुमारास त्रास होऊ लागला त्यानंतर लगेच त्यांना माणगाव आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते परंतु त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा न झाल्याने त्यांना तत्काळ 108 ने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले त्यांच्यावर रुग्णालयामध्ये अधिक उपचार सुरू आहे. चार दिवसांपूर्वी चौकुळ येथील चार व्यक्तींनी अशाच प्रकारची विषारी आळंबी खाल्ल्याने विषबाधा झाली होती.आळंबी खाताना योग्य ती काळजी घेण्याचे आव्हान सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव, लक्ष्मण कदम व सुजय सावंत यांनी त्यांना सहकार्य केले.

.