Home स्टोरी माझ्या पक्षातून सगळे बाहेर पडले तरीही अण्णा माझी सोबत सोडणार नाहीत! रामदास...

माझ्या पक्षातून सगळे बाहेर पडले तरीही अण्णा माझी सोबत सोडणार नाहीत! रामदास आठवले

175

अण्णा रोकडे यांच्या वाढदिवस समारंभात रामदास आठवले यांनी अण्णा रोकडें यांचेवर व्यक्त केला विश्वास!

कल्याण प्रतिनिधी:(आनंद गायकवाड): – अण्णा रोकडे हे माझे विश्वासू सहकारी आहेत, माझ्या बरोबरचे अनेक सहकारी मला सोडून गेले आहेत, परंतु अण्णा माझी सोबत कधीही सोडणार नाहीत असा विश्वास रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी अण्णा रोकडे यांच्या वाढदिवस समारंभात व्यक्त केला .कल्याण नगरीचे प्रथम नगराध्य, दलीत पँथर, दलीत मित्र ते रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे प्रदेश उपाध्यक्ष असा प्रवास करीत बहुजन समाजावर अधिराज्य गाजवणारे समाज भूषण अण्णा रोकडे यांचा ८५ वा वाढदिवस त्यांच्या चाहत्यांनी कल्याण नगरीत मोठ्या उत्साहात साजरा केला . या निमित्त वालधुनी येथील रेल्वेच्या सांस्कृतीक भवनात वाढदिवस स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमास रामदास आठवले हे खास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी त्यांनी अण्णा रोकडे यांच्या स्वभाव धर्माचे कौतुक करतांना सांगितले की, अण्णां रोखठोक भूमिका मांडणारे आमच्या पक्षातील जेष्ठ नेते आहेत, परंतु ते अनेक वेळा इकडे गेले, तिकडे गेले अशा वावड्या उठवल्या जातात, परंतु अण्णा हे पहिल्या पासुनच माझ्या आणि माझ्या पक्षाबरोबर एकनिष्ठ आहेत, ते मला सोडून कोठेही जाणार नाहीत याची मला खात्री आहे .या कार्यक्रमात अण्णांच्या चाहत्या आयुमती निकीता राव यांनी आणलेला ८५ किलोचा केक रामदास आठवलेंसह उपस्थित अनेक मान्यवरांच्या हस्ते कापून अण्णांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या .अण्णांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दलित पँथर चळवळीत सक्रीय राहून शहीद झालेल्या ७ शहीद पँथरांचा मरणोत्तर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच आंबेडकरी चवळीला चालना देणाऱ्या ८५ आंबेडकरी समाज बांधवांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला .माजी दारूबंदी आणि उत्पादन शुल्क मंत्री जगन्नाथ पाटील यांच्या अध्यक्षते खाली पार पडलेल्या या कार्यक्रमात अण्णा रोकडे यांच्या जिवन चरित्रावर आधारीत माहीती पट दाखवण्यात आला तसेच गौरव पुस्तीकेचेही प्रकाशन करण्यात आले .अण्णा रोकडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी लाँग मार्चचे प्रणेते आणि पिपल्स रिपब्लीकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा जोगेंद्र कवाडे, जेष्ठ नेते शामदादा गायकवाड, माजी आमदार पप्पू कलानी, शहर प्रमुख महेश गायकवाड, यांचे सह प्रा . विठ्ठल शिंदे, व्याख्याते आणि पत्रकार कीरण सोनवणे, अँड चंद्रकांत वाघमारे, माजी नगरसेवक हर्षवर्धन पालांडे, महादेव रायभोळ, विशाल पावशे, माजी नगसेविका, माधुरी काळे, संगिता गायकवाड, सुशिला माळी, तसेच सुबोध भारत, उत्तम गवळी, सुमेध हुमणे, संजय मोरे, अजय सावंत, देवचंद अंबादे, मिलींद बेळमकर, अशोक भोसले, रवी पाटील, राजेश गवळी, किशोर कागदे, रवी देवळे, अनिल एटम आदी असंख्य मान्यवर आणि समाजबांधवांनी अण्णा रोकडे यांना ८५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या .अण्णा रोकडे यांचे सुपुत्र केतन रोकडे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेल्या या वाढदिवस सदिच्छा समारंभास आंबेडकरी चळवळीतील अनेक गणमान्य नेते आणि समाज बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश जाधव, भिमराव डोळस, अनामिका महाले, मिराताई वासनिक, अर्चना कदम, शोभा केदारे, संग्राम मोरे, संतोष जाधव आदी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले . कार्यक्रमाचे सुत्र संचलन पत्रकार प्रदिप जगताप यांनी केले .