Home राजकारण माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपात जाणार?….विखे-पाटील यांची ऑफर

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपात जाणार?….विखे-पाटील यांची ऑफर

64

भाजपा नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी माजी मुख्यमंत्री अशोक पाटील यांना भाजपात प्रवेश करण्याची ऑफर दिल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. अशोक चव्हाण हे एक सक्षम नेते आहेत. काँग्रेस पक्षाचं भविष्य अंधारमय आहे. त्यामुळे अशोकराव चव्हाण यांनी भाजपात प्रवेश करण्याचा विचार करावा. अशी खुली ऑफर विखे-पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण

नेमकं काय म्हणाले विखे-पाटील म्हणाले?…. “अशोक चव्हाण सध्या ज्या पक्षात आहेत. त्या काँग्रेस पक्षाचं भविष्य काय आहे? नाशिक पदवीधर मतदारसंघात व्यक्तिगत अजेंड्यावर निवडणूक जिंकली. तिथे पक्षाचा कुठेही विचार झाला नाही. पक्षाचा विचार करण्यासाठी काँग्रेसमध्ये कुणालाही वेळ नाही. मला वाटतं की अशोक चव्हाण हे एक सक्षम नेते आहेत. त्यांनी मुख्यमंत्री पदावर काम केलं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व संपूर्ण जगाने स्वीकारलं आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला सर्वांनाच आवडेल. अशोकराव चव्हाणांनीही याबाबत विचार केला पाहिजे.