Home स्टोरी नरेश म्हस्के यांच्या विधानाला आम्ही फारसे महत्त्व देत नाहीत! अजित पवार.

नरेश म्हस्के यांच्या विधानाला आम्ही फारसे महत्त्व देत नाहीत! अजित पवार.

61

ज्यांनी पक्षात आणि घरात गद्दारी करण्याचा प्रयत्न केला त्यांनी आमच्या विषयी बाेलू नये अशी टिप्पणी करणा-या ठाण्याचे माजी महापाैर नरेश म्हस्के यांच्या विधानाला आम्ही फारसे महत्त्व देत नाही. असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार , राेहित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी नमूद केले. पवार कुटुंबिय काय आहे हे संपुर्ण महाराष्ट्राला माहित आहे असे अजित पवारांनी नमूद केले. म्हस्के यांच्या विधानावर खासदार सुप्रिया सुळेंनी पवार यांचे नाव घेतल्याशिवाय ज्यांचे राजकारण पूर्ण होत नाही त्यांनी बिनदास्त बोलावं अशी टिप्पणी केली. जे बाेलताहेत ते एमसीएचे मतदार आहेत का? असेही सुळेंनी नमूद केले.

रोहित पवार


म्हस्केंना पवार कुटुंब कळणार नाही – राेहित पवार

म्हस्के यांच्या विधानावर आमदार राेहित पवार म्हणाले त्यांना कधी भेटलाे नाही. ते दादांवर, आव्हाडांवर बाेलले. मी तर साधा कार्यकर्ता आहे. परंतु त्यांना एकच सांगताे क्रिकेट आणि पवार कुटुंब त्यांना कधीही कळणार नाही अशी टिप्पणी आमदार राेहित पवार यांनी केली.

सुप्रिया सुळे
नरेश म्हस्के
अजित पवार


आलतू फालतू स्टेटमेंटला महत्व देत नाही – अजित पवार

अजित पवार म्हणाले मी असल्या आलतू फालतू स्टेटमेंटला महत्व देत नाही. आम्ही कधीच घरात अशा पद्धतीने वागत नाही. संपुर्ण महाराष्ट्राला माझे वागणे माहित आहे. जे मी बाेलताे तेच करताे. राेहित हा माझा पुतण्या आहे. माझ्या मुलासारखा आहे. त्यामुळे माझ्याकडून अशा घटना घडणार नाहीत हे सर्वजण जाणतात.