Home स्टोरी माजी नगरसेवक नासिर शेख यांच्यावर अजून तरी हद्दपार ची कारवाई नाही! पोलीस...

माजी नगरसेवक नासिर शेख यांच्यावर अजून तरी हद्दपार ची कारवाई नाही! पोलीस तपास सुरु आहे.

141

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडीत माजी नगरसेवक नासीर शेख यांच्यावर तडीपार कारवाई होणार अशी बातमी अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. प्रकरण असं आहे की, काही दिवसांपूर्वी सावंतवाडी आठवडा बाजारात काही किरकोळ वादावरून नासिर शेख यांनी आठवडा बाजारातील एका भाजी विक्रेत्यावर किरकोळ वादावरून छातीवर कोणत्या पिस्तूल लावून धमकवलं होतं. अशी माहिती सामाजिक कारकर्ते रवी जाधव यांनी दिली पोलिसांना देली. नासिर शेख यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्यांच्या पिस्तूलचे लायसन रद्द करून त्यांच्यावर सावंतवाडी शहरातून हद्दपारची कारवाई करण्यात यावी अशी मागणी सावंतवाडी पोलीस स्टेशनकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पुढे नेमकं काय होणार आहे? याबाबत अजून तरी कोणत्या प्रकारची माहिती मिळत नाहीय. रवी जाधव यांनी नासिर शेख यांचं पिस्तूल आणि वाहन जप्त करून नाशिक शेख यांच्यावर लवकरच हद्दपारची कारवाई पोलिसांकडून होणार. अशी माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे. मात्र सावंतवाडी पोलीसांनी अशा प्रकारची कारवाई अजून तरी करण्यात आलेली नाही.अशी माहिती दिली आहे. तसेच कुणावरही हद्दपार ची कारवाई अशी तात्काळ करता येत नाही. त्याबाबत सर्व प्रकारची माहिती तपासणे, सर्व प्रकारचे पुरावे जमा करणे, कोणत्याही व्यक्तीला हद्दपार करण्यासाठी त्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत काय ? आणि खरोखर हद्दपार करण्याची सारखी परिस्थिती आहे काय? याची पूर्णपणे पडताळणी केल्यानंतर कोर्टाच्या आदेशानंतरच त्या व्यक्तीला हद्दपार करण्यात येते. अशी माहिती मिळत आहे. त्यानुसार अजून तरी नासिर शेख यांच्यावर हद्दपारची कारवाई करण्यात आलेली नाही. पुढे पोलिसांचा तपास सुरू आहे. हद्दपारची कारवाई होणार की नाही? याबाबत अजून तरी कोणतीही माहिती मिळालेली नाही.